शिरोळ येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त शिरोळ शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.शहरातील अनेक स्वामी भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन करून प्रगट दिन भक्तिभावाने साजरा करण्याची तयारी केली आहे.याच पार्श्वभूमीवर शिरोळ येथील पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या सोमेश्वर निवासस्थानी २० मार्च रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून होणार आहे.त्यानंतर सामूहिक आरती, नामस्मरण आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी आमदार अशोकराव माने,माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील,नगराध्यक्ष सौ. योगिता कांबळे,उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगेचे व्हाईस चेअरमन बाबा पाटील तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घ्यावे तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आशुतोष माळी यांनी केले आहे.या कार्यक्रमामुळे शिरोळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!