पुलाची शिरोलीत तब्बल ४५ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर मिळणार असल्याने गॅसधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

इराण आणि इज्राईल – अमेरिका युद्ध सुरू आहे.त्यामुळे आखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबला आहे.त्यामुळे देशात गॅस संकट निर्माण झाले आहे.त्या कारणांमुळे पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे घरगुती गॅस सिलिंडर तब्बल ४५ दिवसांनंतर वितरण करण्याचा नियम प्रशासनाने लागू केला आहे.त्यामुळे गॅसधारकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाची शिरोली हे गाव प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे शिरोली गावात शहरी भागाप्रमाणे लाईट बिल, पाणी बिल, घर फळा आकारणी केली जात आहे. पण गॅस सिलेंडर पुरवठा मात्र ग्रामीण भागाप्रमाणे वाटप करण्यात यावे यासाठी गॅस नोंदणी नंतर तब्बल ४५ दिवसांनंतर वितरीत करण्याचा आदेश प्रशासनाने शिरोलीतील जय मल्हार गॅस वितरण एजन्सीला लागू केला आहे.पुलाची शिरोलीत औद्योगिक वसाहतीतील कामगारांमुळे सुमारे बारा हजार इतक्या मोठ्या संख्येने गॅस ग्राहक आहेत.त्यामुळे येथे गॅस सिलिंडर शहराप्रमाणे तीस दिवसाला मिळणे अपेक्षित होते.परंतु पुलाची शिरोली हे गाव ग्रामीणमध्ये धरले असल्यामुळे ४५ दिवसांना गॅस सिलेंडर मिळत असल्यामुळे गॅसधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पुलाची शिरोली परिसरातील मोठ्या संख्येने कुटुंबे स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा अत्यंत संथ गतीने होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी सिलिंडर बुकिंगसाठी प्रयत्न केले आहेत पण अगोदरची सिलेंडर नेल्यापासून ४५ दिवस झाले शिवाय गॅस सिलेंडर मिळणार नसल्यामुळे सध्या अनेक कुटुंबांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.गॅस वितरण केंद्रावर सिलिंडर येणार असल्याची माहिती मिळताच नागरिक सकाळपासूनच सिलिंडर घेऊन रांगेत उभे राहत आहेत. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही उन्हात तासन्‌तास थांबावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही नागरिकांनी सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासून दुपारपर्यंत प्रतीक्षा केली, मात्र मर्यादित सिलिंडर उपलब्ध असल्याने व गॅस सिलेंडर नेल्यापासून ४५ दिवस पूर्ण नसल्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पूर्वी गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरवठा विस्कळीत झाला असून, वेळेत गॅस न मिळाल्यामुळे घरगुती कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना स्वयंपाकासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तर खासगी विक्रेत्यांकडून जास्त दराने गॅस घेण्याची वेळ आल्याचीही गॅसधारकांमधून बोलले जात आहे.गॅस कंपनीकडून ४५ दिवसांची अट लावल्यामुळे पुरवठा उशिरा होत असल्याने वितरणात विलंब होत आहे . पुलाची शिरोली हे गाव प्राधिकरण समाविष्ट असल्यामुळे शहरी भागात प्रमाणे ३० दिवसात गॅस पुरवठा करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ग्राहकांना शक्य तितक्या लवकर गॅस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिरोली गावाचा प्राधिकरणात( शहरी भागात) समावेश आहे. त्यामुळे ४५ दिवसांची अट प्रशासनाने शिथील करून ३० दिवसांची करावी गॅस सिलेंडर धारकातून मागणी होत असल्याचे सागर कौनडे यांनी सांगितले. 

सागर कौंदाडे,

जय मल्हार घरगुती एच.पी.गॅस वितरक,पुलाची शिरोली

Leave a Comment

error: Content is protected !!