पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ‘क्वालिटी कास्टिंग’ कंपनीत आज सोमवारी कंपनीतील मशनरीचां मेन्टेनन्स करते वेळी अचानक मशिन चालू झाल्याने परप्रांतीय कामगाराचा हप्पर मिक्सर मशिनमध्ये सापडून ठार झाला ही घटना सकाळी ११ वाजण्यासुमार घडली.कंपनीतील सिसिटिव्ही काॅमेरे दिड वर्षापासून बंद असल्याने या घटनेचा प्रकार उघडकीस आला असता . पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत परप्रांतीय कामगाराचे नाव सिकंदर भागिरथ पासवान (वय ३० , रा. बिहार ) असे असून तो केवळ २० दिवसांपूर्वीच या कंपनीत कामाला रुजू झाला होता. आज सोमवारी कंपनीतील मशिनच्या देखभालीचे (मेन्टेनन्स) काम काढण्यात आले होते. यासाठी चार कामगारांना बोलावण्यात आले होते. या दरम्यान, फौंड्रीमधील बंद ‘घाणी मिक्सर मशिन’ स्वच्छ करण्यासाठी सिकंदर पासवान हा मशिनच्या हप्पर मिक्सरमध्ये उतरला होता. मात्र, त्याच वेळी अचानक मिक्सर मशिन सुरू झाल्याने तो त्यात अडकला गेला. गंभीर जखमी झालेल्या सिकंदरला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या कंपनीतील फौड्री विभागाचे दीड वर्षापूर्वी मशिनची उंची वाढवण्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी कामात अडथळा निर्माण होत असल्याने कंपनीतील काॅमेरे काढण्यात आले होते .पण हे सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बसवण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. जर कंपनीतील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असती, तर हा अपघात नेमका कसा घडला आणि मशिन नक्की कोणी सुरू केले, याचा उलगडा होऊ शकला असता. सीसीटीव्ही नसल्यामुळे या मृत्यूबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.मृत सिकंदर हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो केवळ २० दिवसांपूर्वीच या कंपनीत कामावर रुजू झाला होता. कामावर रुजू होऊन महिना उलटण्यापूर्वीच त्याचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. कारण सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू आहे याचवेळी अशा प्रकारची घटना घडते मग सुरक्षा सप्ताहाचे पालन फक्त कागदोपत्री मर्यादित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे .