पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाताना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी नागाव मधील एकाच अटक केली त्याच्याकडून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमोल गुंडा गुडाळे वय वर्षे ४८ रा.शिवाजीनगर माळवाडी नागाव ता.हातकणंगले असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पो.काॅ.नजीर शेख यांनी निलम हाॅटेल शेजारी केली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारासअमोल गुडाळे हे आपल्या मोपेड क्र. एम .एच.०९-डी-४८४७ गाडीवरून गुटका व पान मसाला विक्रीसाठी जेवण येत असल्याची गोपनीय माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शिरोली एमआयडीसी पोलीस आणि तात्काळ घटनास्थळी नाव घेत सापळा रचला संशयित वाहनास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला सुगंधी सुपारी विमल पान मसाला तंबाखूजन्य पदार्थांचे पॅकेट्स आढळून आले गुटखा व पान मसाल्याचे बाॅक्स विक्रीसाठी घेऊन जात होते. दरम्यान शिरोली पोलिसांना त्या गाडीवरील बॉक्सबाबत संशय निदर्शनास आला. त्यांनी गाडी अडवून बॉक्स मधील वस्तूंची तपासणी केली असता सुगंधी तंबाखू, सुपारी, गुटखा व पान मसाल्याच्या पुड्या असा सुमारे ४५ हजारांचा मुद्देमाल व मोपेडगाडी असा ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. महाराष्ट्र राज्यात व तंबाखूजन्य सुगंधी पदार्थांच्या उत्पादन, विक्री व साठवण्याची वर शासनाने बंदी घातलेली असताना संबंधित व्यक्ती हा म** विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले.ही कारवाई सपोनी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. फौजदार अमित पांडे पुढील तपास करीत आहेत.