पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका हायवेवर पल्टी झाली या अपघातात चालक व अन्य मदतनीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. हा अपघात शिरोली पुलाची येथील युनिक ऑटोमोबाईल जवळ रात्री ९ वाजण्यासुमार घडला यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, ही रुग्णवाहिका टोप येथे हायवेवर कारचा अपघात झाल्याचा काॅल आला असल्याने ते टोपकडे जात होती अपघातातील रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ही रूग्णवाहिका. महामार्गावरून वेगाने जात असताना अचानक एक दुचाकीस्वार रुग्णवाहिकेच्या समोर आला. त्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका वळवली. मात्र, वेग अधिक असल्याने रुग्णवाहिकेचे टायर घसरून रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडले. रुग्णवाहिका रस्त्यावर पल्टी झाली .अपघात होताच महामार्गावरील प्रवासी आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतील चालक प्रविण पाटील, व डाॅक्टर राहूल पाटील सुरक्षित बाहेर काढले .या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवळत रुग्णवाहिका क्रेनच्या साहाय्याने सरळ करत रस्त्याच्या बाजूला उभी केली त्यानंतर नंतर काही वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली.महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे आणि काही वाहन चालकांच्या बेदरकापणामुळे अशा अपघातांच्या घटना वाढत चालले आहेत विशेषता दुचाकी स्वरांनी अचानक लेन बदलले किंवा इंडिकेटर न देता वळण घेणे हे अपघातास कारणीभूत ठरत आहे वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे