शिरोळ / प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या रहिमतपुरकर कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी नुकत्याच डिसेंबरमध्ये झालेल्या एनएमएमएस (राष्ट्रीय माध्यमिक परीक्षा) मध्ये अपूर्व यश संपादन केले आहे.शाळेतील एकूण १६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून या परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे.यापैकी जान्हवी जितेंद्रकुमार यादव आणि श्रावणी मनोज मक्ते या विद्यार्थिनींनी १३९ गुण मिळवून सर्वोच्च यश प्राप्त केले. त्यानंतर अस्मिता अविनाश कोळी १३०, संस्कृती विश्वजीत पाटील १२५, श्रेया दिग्विजय कोळी ११३, साक्षी भानुदास चव्हाण १०८, कस्तुरी योगेश कांबळे ९९, अनुष्का सागर बिराणे ९५, कल्याणी आनंदराव माने ९३, श्रीनिधी अभिजीत मोहिते ९१, अस्मिता स्वप्निल गवळी ९०, पूजा अजितराव फोंडे ८६, अक्षरा राजाराम काळे ७५, वैष्णवी विष्णू सनदी ७४, आदिती सर्जेराव कांबळे ६७, सोनम विश्वजीत होनमोरे ६५ गुण मिळवले.शाळेतील सर्व विद्यार्थिनींच्या यशामागे मुख्याध्यापिका सौ.व्ही.पी. कांबळे,एनएमएमएस विभागप्रमुख सौ. पी.एन.चौगुले,विषयशिक्षक सौ.पी.व्ही. चौगुले,एस.बी.तराळ,सौ.जे.टी.जौजाळ,सी.एन.कागवाडे, सौ.एस.एस.हंकारे, व्ही.डी.बुवा,क्लार्क एस.बी.पाटील,टी. बी.परीट यांच्यासह शाळेची कमिटी,व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती आणि पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.विद्यार्थिनींच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला शाळेत तसेच शिरोळ परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळत आहे. शाळेच्या शिक्षकांनी आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. यशाची ही झलक केवळ शाळेच्या शैक्षणिक दर्जासाठी नाही तर विद्यार्थिनींच्या आत्मविश्वास वृद्धीसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या भविष्यातील शैक्षणिक कामगिरीसाठी सकारात्मक संदेश मिळाला असून, पुढील वर्षांमध्येही शाळा त्यांच्या विद्यार्थिनींना उच्च दर्जाची शैक्षणिक संधी देण्यास कटिबद्ध आहे.शिरोळ परिसरातील नागरिक, शिक्षक आणि पालक या यशावर आनंद व्यक्त करत आहेत आणि शाळेच्या विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.