शिरोलीत मद्यधुंद अवस्थेत वाहनचालकावर गुन्हा दाखल

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अमलदार कुबेर रहमान मुजावर (बकल नं. १७८४), नेमणूक शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास पिर दर्या समोर, बंगळूर–पुणे रोड, शिरोली पुलाची (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे घडली.आरोपी हरीश रमेश दबडे (वय ४१, रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी, ता. हातकणंगले) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा एक्स.यू.व्ही. चारचाकी वाहन (क्र. MH 51 A 8833) हे वाहन संशयास्पद व बेदरकारपणे चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित वाहनचालकास थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान त्याच्या श्वासातील मद्याचे प्रमाण तपासण्यासाठी मशीनद्वारे चाचणी करण्यात आली असता ‘अल्कोहोल कंटेंट – २४५.९ मि.ग्रॅ./१०० मि.ली.’ इतका आढळून आला. सदर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे संबंधित वाहनचालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले.मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा दंडनीय गुन्हा असल्याने आरोपीविरुद्ध कलम १८५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार पाटील, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे हे करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!