पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव ता. हातकणंगले येथील अनिल पुजारी या मेंढपाळाची ६ बकरी ठार, झाली. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे हि घटना मंगळवारी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी नागांव येथील मेंढपाळ अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी यांच्या सुमारे ३५० मेंढरांचा कळप खतासाठी सुनील आण्णा शिराळे यांच्या शिराळे मळातील शेतात गेली ७ दिवसापासून बसवली आहेत .मंगळवारी रात्री ६ ते ७ वा. सुमारास कोल्हा सदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात ६ मेंढरांची कोकरे जागीच मृत्यूमुखी पडली. शिवाजी राणगे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. वाघमोडे यांनी हि घटना वन अधिकारी यांना कळविली त्यानुसार वनपाल कुलदीप कांबळे , वनरक्षक प्रदीप जोशी व पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी दाखल स्थळाचा पंचनामा केला. डाॅ. प्रवीण नाईक पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना हेर्ले, यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले.घटनास्थळी यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, भेट देऊन तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे. यावेळी डॉ. गोरड, अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी, शिवाजी राणगे, इ. मेंढपाळ उपस्थित होते.