पुलाची शिरोली येथील जुगार अड्ड्यावर छापा ५० हजारांचा मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथील विलासनगर, माळवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाईत ५० हजारांचा मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेत शिरोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील विलासनगर, माळवाडी भागातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत काही लोक बेकायदेशीरपणे ‘तीन पानी’ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी ५:१५ वाजण्यासुमार अचानक छापा टाकून कैलास भीमराव नवले (वय ४४) , नितीन प्रभाकर भोसले (वय ३८) राजेंद्र अशोक इंगळे (वय ४३) , विश्वास भारत गुडे (वय ४०) , बाळू शंकर भालेकर (वय ४५) , राहुल प्रभाकर भोसले (वय ४२ सर्व राहणार विलासनगर माळवाडी शिरोली पुलाची यांना ताब्यात घेवून रोख ७,४२० रुपये व ४३,००० रुपयाचे मोबाईल व जुगार साहित्यास ५० हजार ४२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोहेकॉ रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिलले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इमान महालदार यांच्या पथकाने केली. तर पुढील तपास पोहेकॉ पाखरे करत आहेत .

Leave a Comment

error: Content is protected !!