पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
मौजे वडगांव ता हातकणंगले येथे चोरून कल्याण मटका घेणार्या स्थानिक व्यक्तीवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करत १६ हजाराचा मुददेमालसह आरोपीस अटक करत मालकावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईवरून असे दिसून येते कि शिरोली पोलिसांकडून अवैध व्यवसायाला खतपाणी मिळत असल्यामुळेच गांजा,मटका, देशी विदेशी,गावठी दारू व्यवसायिक जोमात असल्याची नागरिकात चर्चा सुरू आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मौजे वडगाव येथील चौकात कल्याण मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळताच त्यानी स्थानिक रहिवासी असलेला आरोपी मुबारक महंमद हजारी (वय ५२ ) याला कल्याण मटका घेताना रंगेहाथ पकडून त्याच्याकडून मटका बुक मोबाईल , व रोख ६५० रूपये असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर मटका मालक जावेद फकीर रा पेठवडगाव यांच्यावरही गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा घेत आहेत .हि कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.