पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथील उड्डाण पुलावरून खाली पडल्याने वृद्ध महिला जागी ठार झाली ही घटना गुरुवर्य सकाळी अकराच्या सुमारास घडली ठार झालेली वृद्ध महिला सीए तालुका करवीर येथील असून तिचे नाव शांताबाई सखाराम पवार 73 असे आहे ही महिला गोपाळ समाजाची असून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होती. घटनास्थळावरूनरोजच्या प्रमाणे हे येथील आपल्या घरातून शियेफटा येथे येऊन नागाव येथील आंबेडकर नगर येथे आली होती या ठिकाणी तिला चक्कर आल्याने ती उड्डाण पुलावरून सर्विस रोड वरती तोल जाऊन खाली पडली हि महिला दहा पोटावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला भीक मागण्यासाठी तिच्या हातामध्ये पिशवी होती सदरची महिला गोपाळ समाजाची असल्याचे समजते येथील स्थानिक नागरिकांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधून या घटनेची माहिती देतात तात्काळ शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेस पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय येथे पाठवण्यात आले उपचारादरम्यान डॉक्टरांनी सदस्य महिला मयत असल्याचे सांगितले तिच्या मागे मले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.