धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी साजरा केला जाणारा ‘बलिदान मास’ यावर्षीही श्रद्धा, अभिमान आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेतून साजरा करण्यात येत आहे.
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंतचा हा कालावधी ‘बलिदान मास’ म्हणून ओळखला जातो. पुलाची शिरोली शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने दि.१८/२/२०२६ रोजी सकाळी सहा वाजता ५० धारकऱ्यानी सामूहिक मुंडन केले तसेच दररोज ज्या कोणाला मुंडन करायचे असेल त्यांनी आपापल्या पातळीवरती मंडळ करून घ्यावे असे शिवप्रतिष्ठांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे तसेच दररोज सायंकाळी प्रत्येक चौका चौकामध्ये छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा समोर ठेवून श्रद्धांजली वाहिल्यानंतरच सर्व वारकऱ्यांनी अन्नग्रहण करण्याचे आहे बलिदान मास मध्ये गोड पदार्थ मांसाहार एक वेळचे अन्न त्याग गादीवर झोपणे टीव्ही पाहणे पायातील चप्पल सोडणे शुभकार्यास न जाणे अशा पद्धतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासाचे पालन करावे असे आव्हान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी केले आहे.हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या अमानुष अत्याचारांना न जुमानता धर्म आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देणारे आहे.इ.स. १६८९ मध्ये छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडून त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. धर्मांतराचा दबाव, क्रूर यातना आणि अपमान सहन करूनही त्यांनी स्वधर्माचा त्याग केला नाही. अखेरीस ११ मार्च १६८९ रोजी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या या अद्वितीय त्यागामुळे त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी लाभली. त्यांच्या बलिदानातून स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळतो.छत्रपती श्री संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता आणि कर्तृत्व यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास हा केवळ स्मरणाचा काळ नसून स्वराज्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारा पर्व आहे. त्यांच्या त्यागातून राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित राहो, हीच या मासानिमित्त सर्वांची भावना आहे.
* *सामुदायिक मुंडन
*आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहाटे *६ वाजता नाभिक समाज जागे वरती एकत्रित येऊन ५० धारकरी बंधूनी सामुदायिक मुंडन केले यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष *श्विठ्ठल पाटील जिल्हा *कार्यवाह – श्री सुरेशराव यादव तालुका संपर्क कार्यवाह -श्री अर्जुन विष्णू चौगले , गाव कार्यवाह -श्री नितीन चव्हाण तसेच सागर चव्हाण , संदीप जाधव,भरत ठमके, अनिकेत पाटील,आशितोष उन्हाळे, आणि लहान धारकरी उपस्थित होते*
*यासाठी नाभिक समाजातील श्री राहुल चव्हाण, श्री शरद गायकवाड, श्री राजू, संतोष राऊत यांचे बहुमोल सहकार्य लाभले*
*॥ धर्मवीर बलिदान मास ॥*
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या
(आंग्ल दि.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६)
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरोली पुलाची*