पुलाची शिरोली ग्रामपंचायतकडून भाजपच्या नवनिर्वाचित जि.प व पं.स सदस्यांचा सत्कार

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद व तालुका पंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच सौ. पद्मजा करपे होत्या.प्रथम जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सलीम महात व माजी महीला सरपंच सौ. बिस्मिल्ला महात यांचा सत्कार सरपंच पद्मजा करपे व माजी उपसरपंचयांनी कृष्णात करपे यांच्या हस्ते करण्यात आला .पंचायत समिती गणातून सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सौ. कमल प्रकाश कौंदाडे व माजी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे यांचा सत्कार सदस्या सौ. मनीषा संपत संकपाळ व सदस्य प्रतिनिधी उद्योजक संपत संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला.नागाव गणातून सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अरुण मारुती माळी यांचा सह पत्नीक सत्कार उपसरपंच विजय जाधव ग्रामपंचायत सदस्य सदस्य प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी सरपंच पद्मजा करपे मनोगत व्यक्त करताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे, आपल्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट करावा असे सरपंच पद्मजा करपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले आभार माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी मानले व सर्व नवनिर्वाचित सदस्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, उपसरपंच विजय जाधव, राजेश पाटील, सतीश पाटील, कृष्णात करपे, निवास कदम, दीपक रानमाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सौ.सुजाता पाटील,सौ. मनीषा संकपाळ ,सौ.अनिता शिंदे ,सौ.कोमल समुद्रे, वासिफा पटेल, नाजीया देसाई, बाजीराव पाटील, महादेव सुतार ,श्रीकांत कांबळे, महमद महात, डॉ. सुभाष पाटील, योगेश खवरे, संदीप तानवडे, बाबासो देसाई , सदस्य प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!