शिरोळ / प्रतिनिधी
श्री.दत्त सहकारी साखर कारखानाचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी तथा माजी खासदार दत्ताजीराव कदम (आण्णा) यांच्या नातसून व खासदार धनंजय महाडिक यांच्या भगिनी सौ.मनीषाताई रणजीत कदम यांची शिरोळ तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून राजर्षी शाहू आघाडी मार्फत ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल शिरोळ येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.स्व. दत्ताजीराव कदम आण्णांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले श्री.उत्तमराव पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात शिरोळचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष श्री.अमरसिंह माने-पाटील व सौ.वेदांतिका उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते मनीषाताई कदम यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी उत्तमराव पाटील, उल्हास पाटील,मंजूर मेस्त्री, दत्तात्रय काळे, सुजित पाटील,दिपक काळे सर, दरगु पाटील,अजय भोसले, संजय शिंदे,राजु कुंभार, प्रल्हाद पाटील, आयुब मेस्त्री, रमेश पाटील, बबन बन्ने, भाऊसो माने, वैभव माने, श्रीकांत मोहिते, दिनेश जगदाळे, चंद्रकांत कोरे, चंद्रकांत कोळी, सतीश आडगुळे, दयानंद जाधव, शरण कांबळे, नितीन जगदाळे, विनायक दबडे, सुशांत माने, सागर माने, रोहित बाबर, मारुती जाधव, सर्जेराव कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रतिक पाटील, कल्पेश काळे, प्रभू काळे, पार्थ काळे तसेच वंदना पाटील,सरला काळे, रुपाली दिपक काळे, अनुराधा पाटील, रुपाली रमेश काळे, सविता माने, सुनीता माने, प्रमिला काळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी सौ.मनीषाताई कदम यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांना प्राधान्य देत तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहू,असा विश्वास मनीषाताईंनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात मनीषाताई कदम यांचे स्वागत करण्यात आले.संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता.कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.सौ.मनीषाताई कदम यांच्या या विजयामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून,विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.