कोल्हापूर-सांगली महामार्गावर अपघातात तरुण जागीच ठार, मित्र गंभीर

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकार 

कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर साडेतीन वाजण्यासुमार भरधाव दुचाकी आयशर ट्रकच्या मध्ये घुसल्याने लातूरचा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत आहेत.घटनास्थळी शिरोली पोलिसानी व शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जेसिका ॲन्ड्रयुस यांना या अपघाताची माहिती मिळतात 108 ॲम्बुलन्स चालक सागर धनवडे व डॉक्टर मोहित यांना तात्काळ घटनास्थळी ॲम्बुलन्स घेऊन पाठवण्यात आले जखमींना घेऊन ॲम्बुलन्स कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक माहिती अशी कि कोल्हापूर सांगली राज्य महामार्ग हाॅटेल शिवतारा शेजारील टोल नाक्याच्या वळणावर आयशर ट्रक क्रमांक एम एच ०९ जी जे ७०४० हा रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी वळत असताना सांगलीच्या दिशेने जात असलेले तरूणांचा अचानक वळलेला ट्रक दिसला नसल्याने दुचाकी क्रमांक एम एच २४ सी ई १८८५ ही आयशर ट्रकच्या मधील भागात घुसून दुचाकीस्वार आदित्य विजय यादव ( वय २१ ) हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र पवन गोविंद महामुनी ( वय १९ दोघे ही रा हावसा जि लातूर ) हा जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत . आदित्य हा संजय घोडावत युनिवर्सिटीत इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षांत शिक्षण घेत होता आदित्य व पवन हे दोघे अतिग्रे येथे खोली भाड्याने घेवून राहत होते आदित्य हा एकुलता एक असल्याने यादव कुटुंबियांचा लाडका होता त्याचे वडिल शिक्षक असून मुलाच्या अपघाती निधनाने यादव कुटूंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशीरा करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!