शिरोली चुरशीने ७६ टक्के मतदान, शिरोली हायस्कूल केंद्रातील प्रवेशावरून पोलिसांकडे तक्रार, ९५ वर्षीय सोनाबाई पाटील यांनी तर महाडिक व खवरे कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीत चुरशीने पार पडलेल्या शिरोली जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोली, नागाव, संभापूर, सोनारली वसाहत व टोपचा एक प्रभाग मध्ये साधारणता ७६ टक्के मतदान झाले. शिरोली जिल्हा परिषद मतदार संघासाठी परंपरागत भाजपा महाडिक आघाडी विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यात चुरशीचा सामना रंगला. मागील निवडणुकीत शौमिका महाडिक विरोधी खवरे घराण्यातून दोन उमेदवार अशी तिरंगी लढत होऊन त्याचा फायदा महाडिक यांना झाला होता. मागील इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेत स्वाभिमानी आघाडीने पहिले लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांना स्वाभिमानी आघाडी कडून तर माजी सरपंच प्रतिनिधी सलीम महात यांना भाजप महाडिक आघाडीकडून संधी देण्यात आली. याशिवाय शिरोली पंचायत समिती साठी ग्रामपंचायत सदस्य कमल कौंदाडे यांनी भाजपा गटाकडून तर शुभांगी पाटील यांनी स्वाभिमानी आघाडी कडून तर नागाव पंचायत समिती साठी नागावचे माजी सरपंच अरुण माळी भाजप आघाडी कडून या नागावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळंंकुरे यांनी निवडणूक लढवली. अतिशय चुरशीने ही निवडणूक पार पडली साम-दाम-दंड-भेद याचा वापर करण्यात आला. दरम्यान दुपारी शिरोली हायस्कूल येथे दोन्ही गटाकडून उमेदवारासोबत आलेल्या समर्थकांना मतदारसंघात प्रवेश देऊ नये अशी पोलिसांकडे मागणी करण्यात आली. त्यातून किरकोळ वादावादी झाली हा वाद पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढविण्यात आली. मतदान संथ गतीने होते.दुबार मतदारांचीही संख्या होती. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना अडचण येत होती. दुपारी दोन वाजेपर्यंत ४८ टक्के पर्यंत मतदान पोहोचले होते.अखेर मतदान ७६ टक्केपर्यंत पोहोचले. माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल महाडिक सौ शौमिका महाडिक यांनी ज्ञानदीप विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला तर विरोधी शशिकांत खवरे,शुभांगी पाटील यांनी कुमार विद्यामंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदारांसाठी दोन्ही गटाकडून रिक्षा वाहतुकीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. ज्येष्ठ सोनाबाई पाटील यांनी ९२ वर्षी मतदानाचा कन्या मंदिरात हक्क बजावला.