सलग दुसऱ्या दिवशीही पुन्हा चोरट्यांकडून शिरोली पोलीस ठाणा च्या हद्दीत इलेक्ट्रिक मोटार फोडून आतील तांब्याच्या पट्ट्या व केबल लंपास, चोरीचे सत्र सुरूच शेतकरी हवालदिल,शिरोली पोलिस ठाण्यावर संस्थां व शेतकऱ्यांचे वतीने मोर्चाचा इशारा
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पश्चिम बाजूचे पंचगंगा नदी काठावरील पद्माई बंधूंचे दोन इलेक्ट्रिक मोटार फोडून आतील तांब्याचे साहित्य ,केबल पट्ट्या लंपास करून चोरट्यांनी शिरोली पोलिसांना आव्हान दिले आहे. नुकतेच सोमवारी तानवडे यांचे मालकीची २५ हजाराची केबल सीसीटीव्ही फोडून लंपास केली. आणि दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पुन्हा त्याच बाजूच्या तीन इलेक्ट्रिक मोटारी फोडून चोरट्यानी आतील तांबे व केबल लंपास केली. आज पर्यंत इतक्या शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी केबल स्टार्टर पट्ट्याचे चोऱ्या झाल्या परंतु पोलिसांकडून अद्यापि तपासात प्रगती नाही. आज पर्यंत विकास संस्थे मध्ये दोन वेळा, पाणीपुरवठा संस्था, वीज वितरण कंपनीचे ट्रांसफार्मर मधील वायर, याशिवाय खासगी मालकीच्या मोटार पंपाचेही तांब्याचे केबल ,पट्ट्या,स्टार्टर, चोरीचे सत्र सुरूच आहेत. याबाबत शिरोली पोलिसांना या चोरट्यांना जेरबंद करण्यास यश आलेले नाही. नुकतेच विशाल तानवडे यांच्या मालकीच्या २५ हजार किमतीची केबल चोरट्यानी लंपास केली .विशेष म्हणजे त्यांनी या हद्दीतील सीसीटीव्ही ही फोडून टाकला आहे.ज्या ज्या वेळी चोऱ्या झालेल्या आहेत.त्या त्या वेळी शिरोली पोलिसांकडून सीसीटीव्ही बसवा असे आव्हान केले होते.विशाल तानवडे यांनी बसविला आहे परंतु तो सीसीटीव्ही चोरट्यांनी फोडून केबल लंपास केली.आणि आज दुसऱ्याच दिवशी उत्तम राजाराम पद्माई , यशवंत दत्तू पद्माई व राजेंद्र खटाळे यांच्या मालकीच्या तीन मोटारी फोडून आतील तांब्याचे मटेरियल चोरट्यांनी लंपास केले. आज पर्यंत इतक्या चोऱ्या होऊनही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना पाहणीसाठी वेळ मिळाला नव्हता परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यानी आव्हान दिल्याने शिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी पाहणी केली. अशाच पद्धतीने या अधिकाऱ्याने जर शिरोली स्क्रॅप व्यावसायिकावर छापामारी केली तर त्याचे धागेदोरे पोलिसांचे हाती लागण्याचे शक्यता वर्तवली जात असली परंतु पोलिसांचे त्यांच्यासोबत असणारे लागेबांधे यात अडथळा ठरत आहे.दरम्यान शिरोली येथील विकास, पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने व ज्यांच्या मोटारीचे साहित्य लंपास केलेआहे अशा बाधित शेतकऱ्यांकडून निवडणुकीनंतर शिरोली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.