उदगाव / प्रतिनिधी
उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून,या मतदारसंघातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या भाजपचे नेते सावकर मादनाईक यांच्याविरोधात विरोधकांकडून बिनबुडाचे व तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी थेट नाते निर्माण करणाऱ्या मादनाईक यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.सावकर मादनाईक यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून पारदर्शक व सर्वसामान्य नागरिकांनासाठी समाजकार्याला वाहून घेतले आहे.उदगाव मतदारसंघात अनेक तरुणांना संधी देत त्यांना राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच मतदारसंघात त्यांचे वर्चस्व वाढले असून,याच भीतीपोटी विरोधकांकडून अपप्रचाराची रणनिती राबवली जात असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांकडून सावकर मादनाईक यांनी राजकारणातून पाच कोटी रुपये मिळवले असून, त्या रकमेचा वापर करून पेट्रोल पंप व महागड्या गाड्या खरेदी केल्याचे आरोप केले जात आहेत.मात्र या आरोपांना कोणताही पुरावा नसून, आजपर्यंत उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मादनाईक यांच्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप झालेला नाही, हे विशेष,सावकर मादनाईक यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधक अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकीत जनतेसमोर काम मांडण्याऐवजी आरोपांच्या चिखलफेकीचा मार्ग निवडला जात आहे. मात्र उदगावची जनता सजग असून,ही राजकीय खेळी ओळखण्यात ती यशस्वी ठरत आहे.दरम्यान, मतदारसंघात विकासकामे,सामाजिक सलोखा आणि स्वच्छ प्रतिमा याच मुद्द्यांवर जनता ठाम असल्याचे चित्र आहे.त्यामुळे विरोधकांचा अपप्रचार उलट त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे असून,सावकर मादनाईक यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे मत प्रदीप वरेकर यांनी व्यक्त केले आहे.