शिरोळ तालुक्यातील भाजपच्या सर्व उमेदवार निवडून देण्याचे सावकर मादनाईक यांचे आवाहन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली असून,भाजपच्या वतीने ४ जिल्हा परिषद व ७ पंचायत समितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत.या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन भाजपचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी केले आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकताच शिरोळ तालुक्याचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजप विचारांचे प्रतिनिधी असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.या दौऱ्यानंतर शिरोळ तालुक्यात भाजपच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रचाराला वेग आला आहे.भाजप सरकारने राबविलेल्या विविध विकासकामांचा व जनकल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.यावेळी बोलताना अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी सांगितले की, भविष्यात तरुणांसाठी रोजगाराभिमुख योजना, शेतकऱ्यांच्या पाणी,कर्जमाफी व बाजारपेठेशी संबंधित प्रश्न तसेच महिला भगिनींसाठी स्वयंरोजगाराच्या योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर भाजपचे सक्षम व विकासाभिमुख उमेदवार सभागृहात जाणे आवश्यक आहे.भाजपचा प्रत्येक उमेदवार हा विकासाच्या विचाराने काम करणारा असून, तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजप कार्यकर्त्यांनी बूथनिहाय प्रचारावर भर देत मतदारांपर्यंत पोहोचावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.एकूणच शिरोळ तालुक्यात भाजपच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत भाजप आपली ताकद दाखवेल,असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!