पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पेठ वडगाव इथल्या टेलिफोन ऑफिस मधील एक्साइड च्या बॅटरी, दीडशे फुटाच्या दोन कॉपर केबल असा सुमारे एक लाख 48 हजार रुपये चा मुद्देमाल दि 29 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पुन्हा चोरट्यानी पहाटे तीन वाजता याच ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथं कोल्हापूर रोडवर भारत दूरसंचार टेलीफोन ऑफिस आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून ए बी शिंदे हे काम करतात. तर तंत्रज्ञ म्हणून अरुण भीमराव मंडले हे काम करतात. तर त्यांना सहाय्यक म्हणून कृष्णात शिनगारे कार्यरत आहेत. दिनांक 29 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दूरसंचार कार्यालयातील 28 हजार रुपये किमतीची एक्साईड बॅटरी, आणि दीडशे फुटाच्या दोन कॉपरच्या केबल असा सुमारे एक लाख 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबतची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात नोंद होती. दरम्यान आज पहाटे तीनच्या दरम्यान दूरसंचार विभाग बंद पडल्याचा फोन वरिष्ठ अधिकारी ए बी शिंदे यांना आला. त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ 112 नंबरला माहिती दिली. 112 ची पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होताच त्या ठिकाणी 60 फूट लांबीची कॉपरची केबल कट केलेली सापडले.तर दरवाज्याचे मोडतोड केलेली दिसून आले.पोलीस गाडीची चाहूल लागताच चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे निदर्शनास आले. यामध्ये चोरांना अपयश आल्याचे दिसून आले.या घटनेची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.