उदगाव / प्रतिनिधी
“आता नाही तर कधीच नाही” हा नारा सध्या उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात सर्वत्र ऐकू येत असून स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. उदगावची उमेदवारी नाकारून बाहेरच्या उमेदवाराला संधी देण्यात आल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर उदगावमध्ये कमळ चिन्हाभोवती मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील गल्लीबोळ, चौक,कट्टे तसेच वार्डा-वार्डांत नागरिकांमध्ये या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.“सावकर मादनाईक व उदगावच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असून पक्ष,गट,तट, जातीभेद बाजूला ठेवून सावकर मादनाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एकजुटीने मतदान करण्याची भूमिका काही नागरिकांकडून मांडली जात आहे. “उदगावकरांचा आवाज डावलला गेला आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.आजपर्यंत कधीही न घडलेला इतिहास यावेळी घडवण्याचा निर्धार जनतेने केला आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत कमळ चिन्हावर विक्रमी मतदान होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शहरात फिरताना अनेक ठिकाणी हीच चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान,या घडामोडींमुळे उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात निवडणूक प्रचारालाही वेग आला असून विविध राजकीय गटांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.काही राजकीय विश्लेषकांच्या मते,स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे आल्यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.मात्र अंतिम निकाल काय लागतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उदगावमधील सध्याची परिस्थिती पाहता,ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून गावच्या अस्मितेची लढाई बनल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पुढील काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता असून उदगावचा कौल कोणाच्या बाजूने लागतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.