उदगाव / प्रतिनिधी
उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघासह शिरोळ विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापले असून,भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हाला प्रचंड जनसमर्थन मिळताना दिसत आहे.“दिसलं कमळ की मार शिक्का” ही टॅगलाईन आता केवळ घोषणापुरती मर्यादित न राहता मतदारांच्या मनात ठामपणे रुजलेली आहे.विशेषतःसावकार मादनाईक यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निर्णय जनतेने घेतल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे.सत्तेसाठी कोणतीही तडजोड करत प्रामाणिक आणि तळागाळातील नेत्यांना बाजूला सारण्याचे धोरण आता जनतेच्या लक्षात आले आहे.तालुक्यात सावकार मादनाईक, मलाप्पा चौगुले,राजाराम रावण यांच्यासारखे अनेक नेते विविध पक्षांतून पुढे आले असले तरी,जनतेने विश्वासघातकी राजकारण ओळखले आहे.आर्थिक ताकदीच्या जोरावर विरोधकांना दबावाखाली ठेवण्याचे,किंवा स्वतःच्या बगलेत घेण्याचे जुने राजकारण आता चालणार नाही, असा स्पष्ट संदेश मतदार देताना दिसत आहेत.“आमचं ठरलंय आणि सावकरच कमळच धरलय” ही टॅगलाईन सध्या गावोगावी चर्चेचा विषय ठरली असून, शिरोळ तालुक्यात राजकीय वारं पूर्णपणे फिरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांमध्ये भाजपबाबत मोठा सकारात्मक कल दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदगाव येथे मांडलेल्या विविध योजनांचा थेट फायदा महिलांना झाला असून, त्या योजनांचा हिशोब महिलांनी स्वतः लावलेला आहे.महिला सक्षमीकरणासाठी भाजपच्या योजनांना पर्याय नाही,असा विश्वास महिला वर्गामध्ये दृढ झाला आहे.बचत गट,आर्थिक मदत योजना,आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनाच्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये कमळाबद्दल विश्वास अधिक बळकट झाला आहे. त्यामुळे “वारं फिरलया,कमळ धरलय” अशा टॅगलाईन महिला स्वतः प्रचारात वापरताना दिसत आहेत.या सर्व घडामोडींमुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ‘कमळ’ अग्रेसर राहणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेचा विश्वास,महिलांचा सक्रिय सहभाग आणि ठाम नेतृत्व यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचा सूर आता सर्वत्र उमटत आहे.