“तांदळातील खड्यासारखे त्या उमेदवारांना जनता बाजूला काढेल,” दत्तवाड मतदारसंघात स्थानिक उमेदवारालाच पसंती : सौ.दीपा उदय पाटील यांच्या पाठीशी मतदार ठाम

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी 

दत्तवाड मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, मतदारांचा कल स्पष्टपणे स्थानिक व सर्वांशी परिचित असलेल्या उमेदवारांकडे झुकताना दिसत आहे.आरक्षण पडले म्हणून केवळ निवडणूक काळापुरते दोन-चार महिने मतदारसंघात येऊन गावचा विकास आणि प्रश्न सोडवण्याची तळमळ दाखवणाऱ्या उमेदवारांना मतदार साथ देणार नसल्याची ठाम भूमिका दत्तवाडसह परिसरातील मतदारांनी घेतली आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेल्या सौ.दीपा उदय पाटील यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.दत्तवाड व परिसरातील उन्हाळ्यात अपुरा पाणीपुरवठा, रस्ते,आरोग्य,शिक्षण,महिला प्रश्न,शेतकरी अडचणी अशा विविध स्थानिक समस्यांशी उदय पाटील हे कायम संपर्कात असून, त्यामुळेच त्यांचा पत्नी दीपा उदय पाटील मतदारांच्या विश्वासार्ह उमेदवार ठरत आहेत.सत्तेसाठी आणि राजकारणासाठी वेळोवेळी पक्ष बदलणारे आणि निवडणूक काळातच सक्रिय होणारे नेते आता मतदारांच्या लक्षात आले आहेत.अशा संधीसाधू राजकारणाला जनता यावेळी स्पष्टपणे नाकारेल,असा विश्वास अनेक मतदारांनी व्यक्त केला आहे.“तांदळातील खड्यासारखे अशा उमेदवारांना जनता बाजूला काढेल,” अशी भावना नागरिकांमध्ये बोलून दाखवली जात आहे.सौ.दीपा उदय पाटील या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असून,त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. गावागावातील लोकांशी त्यांचा थेट संवाद, अडचणी समजून घेण्याची पद्धत आणि सातत्याने उपस्थित राहण्याची भूमिका यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दोन चार महिने येऊन हळदी कुंकू करून प्रश्न प्रश्न सोडविणार म्हणणारे उन्हाळ्यात पाणी मिळत नव्हतं तेंव्हा कोठे होते असा थेट प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळं दत्तवाड मतदारसंघात ‘स्थानिक उमेदवार असल्याने स्थानिकच प्रश्न सोडवतील अशी भावना अधिक वाढत चालली असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदार आपला कौल सौ.दीपा उदय पाटील यांच्या बाजूने देतील,असा निर्धार मतदारांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळे यावेळी दत्तवाड मतदारसंघाचा निकाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!