उदगाव / प्रतिनिधी
प्रशासनातील अनुभव आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भक्कम साथ यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल चव्हाण हे सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.त्यामुळेच मौजे आगर,उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड,घालवाड,कुटवाड,कनवाड व हसुर या गावांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अमोल चव्हाण यांनी यापूर्वी मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात मौजे आगर गावात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,ग्रामपंचायत इमारत, तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक विकासकामे यशस्वीरीत्या मार्गी लागली. प्रशासनाशी समन्वय साधून काम करण्याची त्यांची पद्धत आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.प्रशासनातील प्रत्यक्ष अनुभव असल्याने जिल्हा परिषद स्तरावरील कामकाज,योजना व निधी वितरण याची चांगली जाण अमोल चव्हाण यांना आहे.याच अनुभवाचा उपयोग करून मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचा त्यांचा ठाम संकल्प असल्याचे ते प्रचारादरम्यान सांगत आहेत.शिक्षण,आरोग्य,रस्ते,पाणी व शेतकरी प्रश्नांवर त्यांचे स्पष्ट धोरण असून विकास हाच त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सक्षम,अभ्यासू आणि काम करण्याची क्षमता असलेला उमेदवार देत उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.सध्या सुरू असलेल्या प्रचार फेरीदरम्यान नागरिक, युवक,महिला व शेतकरी वर्गाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत अधिक रंगतदार होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.