“राजकीय बातमी” उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सावकर मादनाईक यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार ?

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, सावकर मादनाईक यांच्या भूमिकेवरून मोठी चर्चा सुरू आहे.विधानसभा तसेच जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मदत करणारे सावकर मादनाईक जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.यामुळे त्यांच्या राजकीय धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मतदार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.विधानसभा व नगरपालिका निवडणुकांमध्ये सावकर मादनाईक यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सक्रिय पाठिंबा दिला होता.मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार यड्रावकर यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत सावकर मादनाईक यांना बाजूला ठेवले.या घडामोडीनंतर सावकर मादनाईक यांनी आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी भाजप पक्षातून उमेदवार उभा केला आहे.मात्र सावकर मादनाईक यांनी यापूर्वी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेचा फटका आता त्यांना बसत असल्याची चर्चा आहे. विधानसभा व नगरपरिषद निवडणुकांमधील त्यांच्या भूमिकेबाबत उदगावसह संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांना सावकर मादनाईक यांची भूमिका समजली नसून,त्यामुळे एकेकाळी हजारोच्या संख्येनं मागे राहणारे कार्यकर्ते,मतदार आणि जवळचे सहकारी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्यास कार्यकर्ते तयार नसल्याचे चित्र आहे.या संभ्रमावस्थेचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीतील ताकदीवर होताना दिसत आहे.सावकर मादनाईक यांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांची व कार्यकर्त्यांची संख्या घटत असल्याचे संकेत मिळत आहेत.त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सावकर मादनाईक यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या संपूर्ण घडामोडींकडे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय निरीक्षक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.जिल्हा परिषद निवडणूक निकालांमधूनच सावकर मादनाईक यांच्या राजकीय वाटचालीची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.येत्या काळात सावकर मादनाईक कोणती भूमिका घेतात आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!