आलास जि.प.मतदारसंघात विश्वासाची लाट; दादेपाशा पटेल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

बुबनाळ / प्रतिनिधी 

आलास जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या विश्वास,अपेक्षा आणि विकासाची सकारात्मक लाट पाहायला मिळत असून,जनतेकडून मिळणारा प्रतिसाद शब्दांत मांडता येणार नाही, असे भावनिक मत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दादेपाशा पटेल यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले.प्रत्येक गावात, प्रत्येक घरात जनतेचा आत्मीय विश्वास दिसत असून,नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे.दादेपाशा पटेल म्हणाले की,त्यांनी आजवर जात,धर्म,गट-तट न पाहता आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम प्रामाणिक आणि निस्वार्थ भावनेने केले आहे.याच कार्यपद्धतीमुळे मागील पंचवार्षिक कालावधीत सौ.परवीन पटेल यांना जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत या पाच वर्षांत आलास जिल्हा परिषद मतदारसंघात सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात आली.या कालावधीत रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना,मूलभूत नागरी सुविधा, सामाजिक विकासाची कामे तसेच ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आले.अनेक वर्षे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सातत्याने काम करत आलो असून,स्पष्ट नेतृत्व आणि योग्य दिशा असल्यास विकासकामांना कोणतेही अडथळे येत नाहीत,असा विश्वास दादेपाशा पटेल यांनी व्यक्त केला.आज मतदारसंघातील जनता स्वतःहून आमच्या सोबत उभी आहे. गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा थेट सहभाग आणि वाढता विश्वास हेच उद्याच्या मजबूत आणि स्थिर नेतृत्वाची खरी साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील संभाव्य विकासकामे, भविष्यातील योजनांची आखणी आणि विकासाची भक्कम घडी बसवण्यासाठी दादेपाशा पटेल निश्चितच सक्षम ठरतील,असा ठाम विश्वास मतदारांमधून व्यक्त केला जात आहे.एकूणच आलास दादेपाशा पटेल यांच्या बद्दल मतदारसंघात विकास,विश्वास आणि नेतृत्व दिसून येत असून,येणाऱ्या काळात या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळणार,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. 

Leave a Comment

error: Content is protected !!