जयसिंगपूर / प्रतिनिधी
जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटीचा तिसरा शपथविधी व पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात हॉटेल प्राची,जयसिंगपूर येथे संपन्न झाला. या वेळी अशोक भूपाल गुंडे यांनी सन २०२६ साठी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली.या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सांगली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ व पृथ्वी झीरो वेस्ट फाउंडेशनच्या संचालिका डॉ.माधवी दिलीप पटवर्धन उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्लाईड शोच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचे महत्त्व, प्लास्टिकचा मानवी आरोग्यावर व पर्यावरणावर होणारा घातक परिणाम तसेच त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी त्यांच्या व्याख्यानास उत्तम प्रतिसाद दिला.कार्यक्रमास जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. विलासराव पवार, विशेष समिती सदस्य डॉ. राजकुमार पोळ, फेडरेशन २ कच्या अध्यक्षा श्रीमती अनुजाताई पाटील, फेडरेशन आयपीपी प्रशांत माळी, फेडरेशनच्या उपाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी, तसेच स्पेशल ऑफिसर भैय्या कुलकर्णी उपस्थित होते.नूतन अध्यक्ष, कार्यकारिणी व सदस्यांना फेडरेशनच्या युनिट डायरेक्टर ॲड. भाग्यश्री जोशी यांनी शपथ दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मीटिंग कॉल टू ऑर्डर, दीपप्रज्वलन व जायंट्स प्रार्थना झाली. स्वागत व प्रास्ताविक ग्रुपचे संस्थापक व फेडरेशन स्पेशल ऑफिसर सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यानंतर मावळते अध्यक्ष भाग्योदय घाटे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. शपथविधीनंतर नूतन अध्यक्ष अशोक गुंडे यांनी आगामी काळातील उपक्रम व सामाजिक बांधिलकीविषयी आपले विचार मांडले. सर्व मान्यवरांनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक करत मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन ग्रुपचे सचिव चंद्रकांत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन ग्रुप संचालक ओंकार कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम्ने करण्यात आला.यावर्षी सलग दुसऱ्यांदा ५० टक्के सदस्यवाढ साध्य केल्याबद्दल ग्रुपचे विशेष अभिनंदन करण्यात आले.