नृसिंहवाडीला १८ वर्षांनंतर पंचायत समिती सदस्य निवडून देण्याची सुवर्णसंधी

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी 

तब्बल १८ वर्षांनंतर नृसिंहवाडीला पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्याची महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे.आगामी पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नृसिंहवाडी गावातील गुरुप्रसाद खोचरे यांनी उमेदवारी दाखल केली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.गुरुप्रसाद खोचरे हे सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रशासकीय कामकाजाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी पाणीपुरवठा,स्वच्छता,रस्ते दुरुस्ती,तसेच विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. या अनुभवाचा लाभ पंचायत समिती स्तरावर नृसिंहवाडीसह औरवाड,बुबनाळ आणि आलास या गावांना होणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे नृसिंहवाडी गावातून पंचायत समितीसाठी गुरुप्रसाद खोचरे हे एकमेव उमेदवार असल्याने गावकऱ्यांमध्ये एकजुटीचे चित्र दिसून येत आहे. “आपला प्रतिनिधी आपल्या गावातून असावा” या भावनेतून विविध सामाजिक संस्था,युवक मंडळे आणि ग्रामस्थांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.अनेक वर्षांपासून पंचायत समितीत नृसिंहवाडीचा थेट उमेदवार नसल्याची खंत नागरिकांमध्ये होती.ही उणीव भरून काढण्याची संधी यावेळी चालून आल्याचे बोलले जात आहे. भाजप पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांशी सुसंगत काम करण्याचा निर्धार गुरुप्रसाद खोचरे यांनी व्यक्त केला आहे.ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा,शेतीपूरक विकास,युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. “सर्व गावांचा समतोल विकास हाच माझा अजेंडा असेल,”असे त्यांनी नमूद केले.एकूणच, १८ वर्षांनंतर मिळालेल्या या संधीमुळे नृसिंहवाडी आणि परिसरातील गावांच्या विकासाला नवी दिशा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर गुरुप्रसाद खोचरे यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!