साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड डिजिटल शाळेत रूपांतरित

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी 

कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल शाळेच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. पुणे (चाकण) येथील LITENS Automotive कंपनीने आपल्या CSR फंडातून विद्यालयाला १२ अत्याधुनिक इंटरॲक्टिव पॅनल्स प्रदान केले आहेत. या पॅनल्समुळे अध्यापन अधिक प्रभावी, विद्यार्थी-केंद्रित आणि ज्ञानवर्धक होईल, असे विद्यालयाचे व्यवस्थापन सांगते.या इंटरॲक्टिव पॅनल्सचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभास कंपनीचे जनरल मॅनेजर योगेश उपाध्ये, विद्यालयाचे १९९१ सालच्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी व असिस्टंट जनरल मॅनेजर सुहास चिंचवाडे, मॅनेजर फायनान्स राहुल शेषाद्री, तसेच विद्यालयाचे माजी शिक्षक व १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी बोलताना सुहास चिंचवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासात योग्य वापर केल्यास विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होतील आणि भविष्यातील जीवनात यशस्वी ठरतील. त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा अभ्यासासाठी आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले.कार्यक्रमात विद्यालयाच्या एनसीसी ट्रूपने सायलेंट ड्रिल सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली,तर लेझीम पथकाने आपली कला आणि समर्पित सराव सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.या समारंभास साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील,उपाध्यक्ष प्रभाकर कानवडकर, सचिव अजित पाटील, संचालक राजेंद्र आलासे, राजेंद्र मालगावे, निखिल आलासे, तसेच विद्यालयाचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चिंचवड परिवार, १९९१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या प्रेरणादायी समारंभाची सांगता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आली. साने गुरुजी विद्यालयाने या डिजिटल पायऱ्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक आणि ज्ञानसमृद्ध शिक्षणाची दिशा दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!