शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून काँग्रेस नेते गणपतराव पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.जयसिंगपूर – उदगाव सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तसेच औरवाड येथील काँग्रेस पक्षाचे माजी लोकनियुक्त सरपंच अशरफ पटेल आणि पंचायत समिती माजी सभापती कमरुद्दीन पटेल यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे.या राजकीय बदलामुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार यड्रावकर गटाची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.यावेळी बोलताना माजी सरपंच अशरफ पटेल व कमरुद्दीन पटेल यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे सांगितले.रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमुळे तालुक्याचा सर्वांगीण कायापालट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.हा विकास प्रवाह अखंडपणे सुरू राहावा,या उद्देशानेच आपण शाहू आघाडीत प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केवळ राजकारणापुरते न थांबता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार यड्रावकर यांच्यावर आपला ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.या प्रवेशावेळी साहेबपाशा पटेल, मुस्ताक पटेल,लतीफ पटेल, रशीद पटेल, अशपाक चौगुले, नियाज अहमद पटेल (कडते), जमीर पटेल, महेश कांबळे, मजीद हवालदार, सौरभ पटेल, प्रल्हाद कांबळे, मुजाहिद पटेल, कदिर देसाई, लियाकत अली पाटील, सरफराज पटेल, सुनील कांबळे, दस्तगीर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या जाहीर प्रवेशामुळे शिरोळ तालुक्यात राजर्षी शाहू विकास आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे दिसून येत असून आगामी काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.