उदगाव जि.प मतदार संघात “संतोष”ची अपक्ष उमेदवारी आमदार यड्रावकर व सावकर मादनाईक यांना आव्हान ठरणारी 

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे.अपक्ष उमेदवार संतोष बिडवे यांची उमेदवारी या मतदार संघात जोरदार चर्चेत असून,त्यांना गावातील तरुण मंडळ,महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे संतोष बिडवे यांच्या उमेदवारीमुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि सावकर मादनाईक यांच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.उदगाव जिल्हा परिषदेसाठी ओबीसी आरक्षित असून इतरांनी ओबीसी दाखले काढून आरक्षण असणाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये पसरली आहे.त्यामुळे ग्रामस्थ,सामाजिक संघटना आणि तरुणांनी संतोष बिडवे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.संतोष बिडवे हे निष्कलंक,निस्वार्थी आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमी अग्रेसर असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी गेले अनेक वर्ष गावातील विविध सामाजिक उपक्रम,महिला आणि युवकांसाठी केलेले कार्य सर्वांनाच माहीत आहे.या सामाजिक कार्याची उदगाव गावातील सर्व स्तरातील नागरिक त्यांना मोठ्या संख्येने समर्थन देत आहेत.संतोष बिडवे यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण मतदार संघात आमदार यड्रावकर व सावकर मादनाईक यांचे उमेदवारांवर परिणाम होऊ शकतो, यामुळे संतोष बिडवे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी दबाव निर्मिती होत असल्याचे राजकीय विश्लेषकांच्या मत व्यक्त होत आहे.मात्र, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांचे संतोष यांच्यासाठी उदगाव गावासह मतदार संघातून मोठे समर्थन मिळत आहे.त्यामुळं संपूर्ण उदगाव मतदार संघात उत्सुकता आणि राजकीय चढाओढ वाढल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संतोष बिडवे यांच्या अपक्ष उमेदवारीने हा राजकीय संघर्ष अधिक रंगतदार आणि निर्णायक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!