पॅंथर आर्मीचा महायुती उमेदवार सुहास राजमाने यांना पाठिंबा 

Spread the love

रुई / प्रतिनिधी 

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनाच्या वतीने रुई जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने व सौ मीनल मगदूम आणि अश्विनी पवार यांना आज जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी पाठिंबाचे पत्र सुहास राजमाने यांना देण्यात आले. या प्रसंगी सुहास राजमाने यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमास स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभय कुमार काश्मिरी, वैभव पवार, संभाजी बनणे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, तसेच संजय कांबळे, नितीश कुमार, दीक्षांत, राजू मोमीन, भैय्यासाहेब धनवडे, भिकू कांबळे आणि अमर ढंग उपस्थित होते. याशिवाय पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुहास राजमाने यांनी कार्यक्रमात आपल्या मनोगतात सांगितले की,पॅंथर आर्मीच्या पाठिंब्यामुळे मला जिल्हा परिषदेत कार्य करण्यासाठी नवा उत्साह मिळाला आहे.मी स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर लक्ष देण्यास कटिबद्ध आहे आणि त्यांच्या विकासासाठी पुढाकार घेईन.पक्षाचे नेते म्हणाले की, या पाठिंब्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराला मोठी चालना मिळेल आणि आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यांनी कार्यकर्त्यांना देखील नागरिकांपर्यंत पोहोचून उमेदवारांचे विचार शेअर करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितले की, पॅंथर आर्मीच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार स्थानिक राजकारणात मजबूत प्रतिस्पर्धी ठरतील.

Leave a Comment

error: Content is protected !!