सिगारेट न दिल्याने नाश्ता सेंटर चालकावर दगडाने हल्ला; शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिये फाटा येथील ‘पाटील उपहारगृह व नाश्ता सेंटरच्या मालकाने सिगारेट दिले नाही म्हणून दोघा टवाळखोरानी मारहाण केल्याने उपहारगृहचा मालक जखमी झाला दोघांवर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या परिसरात गंगाराम नगरमधील काही स्थानिक टवाळखोर लोकांकडून अशा प्रकारे मारहाण करून दहशत निर्माण करण्याच्या घटना नेहमी घडत आहेत.पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ही वारंवार होत आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जखमी प्रकाश शामराव पाटील यांचे शिये फाटा येथे पाटील उपहारगृह व नाश्ता सेंटर असून येते आज सकाळी कुलदीप पवार व उमाजी खिल्लारी यानी पाटील यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, “मी हॉटेलमध्ये सिगारेट ठेवत नाही,” असे प्रकाश पाटील यांनी सांगताच कुलदीप चिडला. मी कोण आहे तुला माहित नाही का असे म्हणत त्याने पाटील यांना शिवीगाळ केली आणि गळ्याला धरून जमिनीवर पाडले या झटापटी दरम्यान उमाजी खिल्लारी याने शेजारी पडलेला दगड उचलून प्रकाश पाटील यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरात मारला. यामध्ये पाटील जखमी झाले.या बाबतची फिर्यादी प्रकाश पाटील याने शिरोली पोलिसात दिली आहे.शिये फाटा हा क्रशर व्यावसायिक व कामगारांचा थांबण्याचा केंद्रबिंदू आहे येथे व्यवसायाबरोबर अनेक कारनामे दररोज घडत असतात त्यातूनच हे टवाळखोर लोक आपली दहशत निर्माण करून अनेकाना वेठीस धरून त्याना मारहाण करतात त्यामुळे येथील चहा टपरी वाले या लोकांना वैतागले आहेत याच्यावर कारवाई होण्यासाठी अनेकानी प्रयत्न केले पण पोलिसांशी त्यांचे लागेबंद असल्याने कारवाई होण्या अगोदरच मिठवण्यात येते.

Leave a Comment

error: Content is protected !!