आ.यड्रावकर यांनी विरोधकांना डिवचलं…,हातात दगड देणाऱ्यांना नाही मालक म्हणतं नाहीत

Spread the love

गणेशवाडी / प्रतिनिधी 

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार,स्व. दत्ताजीराव कदम, स्व.बाळासाहेब माने,स्व. सा. रे. पाटील, स्व. शामरावअण्णा पाटील या सर्वांनी शिरोळ तालुक्याला एक वैचारिक बैठक दिली आहे.त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे सुरु ठेवला आहे. सर्वसामान्यांच्या हातात दगड देणाऱ्यांना मालक म्हणत नाहीत तर सर्वसामान्यांच्या हाताला काम देणाऱ्यांना मालक म्हणतात. असा टोला विरोधकांना लगावून राजकीय स्पर्धा नक्की करा पण शिव्या देऊन कधीही करू नका, तुम्ही या अगोदर केलेले काम जनतेसमोर दाखवा आणि विकासावर बोला, आलास जिल्हा परिषद मतदार संघात आज पर्यंत सव्वाशे कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. आलास हे एकमेव मतदार संघ आहे ज्या ठिकाणी दादेपाशा पाटेल यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. जे लोक जाती – पातीच्या नावाखाली असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, मात्र या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे ते अशांना थारा देणार नाहीत, त्यामुळे या आलास जिल्हा परिषद मतदार संघात तसेच पंचायत समिती मतदार संघावर राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!