कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ९ व्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी, दि. २४ जानेवारी रोजी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन,कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले.या प्रदर्शनाचे उद्घाटन दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध चित्रकार व छायाचित्रकार मा. विजय टिपुगडे होते.तसेच विविध प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार रियाज ट्रेनर,आदित्य वेल्हाळ, पांडुरंग पाटील,अर्जुन टाकळकर, सत्यम प्रिंटिंग प्रेसचे रोहित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष काळे यांनी केले,तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारणी अध्यक्ष शिवराज तलवार यांनी मांडले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी क्रांतिवीर भुईंबर, सुधीर बाबरे, उत्कर्ष पाटील, अमर चव्हाण, मयुरेश रामपुरे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून डॉ. सुनील महापुरे, अविनाश फडतरे व निलेश जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवराज काळे, द्वितीय क्रमांक वैभव भगत तर तृतीय क्रमांक अविनाश फडतरे यांनी पटकावला. उद्घाटक अजेय दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरा छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य असोसिएशनच्या सदस्यांनी अत्यंत सुंदररीत्या केले असून त्याचा अभिमान वाटतो. तर अध्यक्ष विजय टिपुगडे यांनी या प्रदर्शनातील छायाचित्रांचे पुस्तकरूपात जतन होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास असोसिएशनचे पदाधिकारी आशुतोष कोळी,अभिजित आडूरकर,राहुल चोडणकर,प्रतिक पाटील, राहुल वाळवेकर, मोहन माळी, उपेंद्र मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.दि. २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत हे छायाचित्र प्रदर्शन राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले असून,कला व छायाचित्रण प्रेमींनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यकारणी अध्यक्ष शिवराज तलवार यांनी केले.कार्यक्रमाचे आभार संतोष काळे यांनी मानले.