रुई / प्रतिनिधी
रुई जिल्हा परिषद मतदारसंघात बदलाची लाट निर्माण होत असून,विकासाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणारे युवा नेतृत्व म्हणून सुहास राजमाने यांना साथ द्यावी, असे आवाहन रुई मतदारसंघातील तरुण वर्गाकडून करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात पायाभूत सुविधा, रोजगार संधी,आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.यामुळे आता तरुणाई पुढे येऊन सक्षम,अभ्यासू आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार करत आहे.सुहास राजमाने यांनी युवक प्रश्न,स्थानिक विकास आराखडे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगारी, शेतीपूरक उद्योगांचा अभाव,तसेच तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आवश्यक असलेल्या संधी उपलब्ध करून देण्यावर राजमाने यांचा भर असल्याचे सांगितले जाते.बदल घडवायचा असेल तर केवळ आश्वासन नव्हे,तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मतदारसंघातील तरुणांकडून व्यक्त होत आहे.सामान्य नागरिकांचे प्रश्न जिल्हा परिषद पातळीवर प्रभावीपणे मांडणे,निधीचा योग्य वापर करणे आणि प्रशासनावर जनतेच्या हक्कांसाठी दबाव निर्माण करणे,ही अपेक्षा नव्या नेतृत्वाकडून आहे.या पार्श्वभूमीवर सुहास राजमाने यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून,आगामी काळात रुई जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बदल होणार असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.