अर्जुनवाड मतदारसंघात सौ.सीमा म्हैशाळे यांना मिळतोय मोठा पाठबळ; म्हैशाळे कुटुंबाबद्दल मतदारांचा विश्वास अधिक दृढ

Spread the love

अर्जुनवाड / प्रतिनिधी 

अर्जुनवाड परिसरात सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या म्हैशाळे कुटुंबाच्या कार्याची दखल मतदारांनी घेतली असून येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत अर्जुनवाड मतदारसंघातून सौ.सीमा जितेंद्र म्हैशाळे यांना मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.चिंचवाड,अर्जुनवाड, घालवाड,कुटवाड, कनवाड व हसुर या गावांतील नागरिकांमध्ये याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.म्हैशाळे कुटुंबाने कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी,समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना न्याय मिळवून देणे,त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे हेच या कुटुंबाचे प्रमुख ध्येय राहिले आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये म्हैशाळे कुटुंबाबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण झाला आहे.या विश्वासाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीने अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातून सौ.सीमा म्हैशाळे यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्या उमेदवारीचे सर्वत्र स्वागत होत असून महिला,युवक व ज्येष्ठ नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात समर्थन व्यक्त होत आहे. सौ.सीमा म्हैशाळे या शांत,संयमी व कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळखल्या जात असून त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, लोकांशी थेट संवाद साधणारे उमेदवार देऊन शिरोळ तालुक्यात राजर्षी शाहू विकास आघाडी अधिक भक्कम केली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने तालुक्यात विकासाचा वेग वाढवला असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.येणाऱ्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सर्वच उमेदवारांना मतदार निश्चितच साथ देतील आणि राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठे यश मिळेल,असा आशावाद मतदारसंघात व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!