शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, विविध सहकारी संस्थांचे संस्थापक आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार सहकार महर्षी स्व.दत्ताजीराव बाबुराव कदम (अण्णा) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी गणपतराव पाटील यांनी स्व.दत्ताजीराव कदम अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजीत अशोक कदम यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी, तर स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक दरगु माने गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी पुष्पकमले अर्पण करून आदरांजली वाहिली.कार्यक्रमास शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, इंद्रजीत पाटील,ॲड. प्रमोद पाटील, बसगोंडा पाटील, अमर यादव, सुरेश कांबळे, सिदगोंडा पाटील, मलकारी तेरदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, गेस्ट हाऊस मॅनेजर शक्तिजीत गुरव, प्रोडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, स्टोअरकिपर एस. व्ही. शिंदे, सिव्हिल इंजिनिअर जे. के. जंगम, को-जन मॅनेजर विजय इंगळे, पर्यावरण मॅनेजर सुनील पाटील, सिव्हिल ओव्हरसीयर अनिल सुतार, पी. ए. टू चेअरमन विलास माने, ओएस अशोक चौगुले, अजय भोसले (कुरुंदवाड), श्रीकांत पाटील (शिरोळ) उपस्थित होते.यावेळी कामगार युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त ग्राहक भांडार या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते व कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्व. दत्ताजीराव कदम अण्णांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.