रुई जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुहास राजमाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

रुई / प्रतिनिधी 

भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास राजमाने यांनी रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे,आमदार राहुल आवाडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश हाळवणकर तसेच राजू मगदूम आणि धनंजय टारे यांनी उपस्थित राहून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास समर्थन दिले.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रूई जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामस्थ,महिला कार्यकर्त्या, तसेच भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मतदारांचा उत्साह आणि उमेदवारांना मिळालेला पाठिंबा उल्लेखनीय ठरला. सुहास राजमाने यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या हित संबंधातून मतदार संघात विकासाभिमुख दृष्टिकोनातून कायापालट करतील असा विश्वास मतदारांन व्यक्त केला.यावेळी सुहास राजमाने म्हणाले,जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणजे विजयाची खरी ताकद असून आपले नेतृत्व सतत प्रगती आणि विकासासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला.भाजप महायुतीच्यावतीने रुई जिल्हा परिषद निवडणुकीत तरुण होतकरू असणारे सुहास राजमाने यांना संधी दिली असून त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु होईल असा निर्धार व्यक्त केला आहे.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी संकल्प व्यक्त केला.राजमाने यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक शाळा,रस्ते,पाणीपुरवठा आणि सामाजिक सुविधांसह ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यामुळं जनतेचा विश्वास,कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विकासाभिमुख नेतृत्व यांचा एकत्रित पाठिंबा हीच निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार आहे.यावेळी सर्वच उपस्थितांनी उमेदवारांना शुभेच्छा देत विजयाच्या संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!