शिरोळ / प्रतिनिधी
अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातून सौ सीमा जितेंद्र म्हैशाळे यांचा उमेदवारी अर्ज राजर्षी शाहू विकास आघाडीकडून दाखल करण्यात आला.या वेळी माजी आमदार उल्हासदादा पाटील, माजी सरपंच नंदू पाटील, माजी सरपंच विकास पाटील, नगरसेवक उदय डांगे,अभिजित जगदाळे, सचिन जोंग यांसह विविध ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत.यामध्ये रस्ते, शाळा,आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा प्रगतीशील बदल झाला आहे. या विकास कामांचा लाभ स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मिळाला असून, या यशाच्या जोरावर सौ सीमा म्हैशाळे यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे.सौ सीमा म्हैशाळे म्हणाल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काम करण्याची संधी दिली आहे या संधीचा उपयोग मतदारसंघाच्या विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ सीमा म्हैशाळे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.