शिरोळ पालिकेच्या बांधकाम सभापतीपदी सौ.अनिता संकपाळ यांची बिनविरोध निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी  

शिरोळ नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडी मंगळवारी पालिका सभागृहात पार पडल्या.स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सौ.अनिता संकपाळ, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी विजय आरगे,पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.कल्पना काळे, उपसभापतीपदी सौ. अनुराधा गुरव,शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शरद उर्फ बापू मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव नगरसेवकांच्या उपस्थितीत विशेष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यामध्ये विरोधी शाहू आघाडीच्या नगरसेवकांनाही समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शिरोळ पालिकेत उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलने यश मिळवले आहे. मंगळवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत विशेष समितीच्या सभापती पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्याकडे विशेष समितीच्या सभापती पदाचे पत्र सादर करण्यात आले. सायंकाळी चार वाजता निवड झालेल्या विशेष समिती सभापती आणि सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर बोलताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव म्हणाले, विशेष समिती सभापती व सदस्यांना आपल्या समितीच्या कार्याची माहिती घेऊन कोण कोणते कार्य प्राधान्याने करणे आवश्यक आहे याची यादी करावी व त्या पद्धतीने काम करू. सर्वांनी आपापल्या प्रभागातील महत्त्वाच्या कामांची यादी करावी. पहिल्या शंभर दिवसात तयार करण्यात आलेल्या आराखडाप्रमाणे सर्व कामे होणार आहेत. पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा याबाबत प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.यावेळी कल्पना काळे, सौ दिपाली फल्ले, सौ अनुराधा गुरव, ओंकार माने-गावडे, दीपक भाट, सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना शिरोळ शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिरोळ पालिकेतील विषय समिती अशी.  

स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा योगिता कांबळे, सदस्य उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव,सौ. अनिता गजानन संकपाळ, सौ.कल्पना पंडित काळे, विजय वसंतराव आरगे, शरद उर्फ बापू सुरेशराव मोरे.

 

सार्वजनिक बांधकाम समिती सभापती- सौ.अनिता गजानन संकपाळ, सदस्य – ओंकार अरुण माने – गावडे, सविता बबन पुजारी, अमरसिंह शिवाजीराव पाटील.

 

स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी- विजय वसंतराव आरगे, सदस्य – उल्हास लक्ष्मण आवळे, सौ.सुवर्णा अरुण कांबळे, सौ.शिवानी सुरज कांबळे.

 

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह अशोकराव यादव, सदस्य – दीपक कृष्णराव भाट, राहुल अनिल कोळी, अमरसिंह कृष्णराव शिंदे.

 

महिला व बाल कल्याण समिती सभापती – सौ.कल्पना पंडित काळे, उपसभापती – सौ.अनुराधा सत्यजित गुरव, सदस्य-सौ दिपाली विवेक फल्ले,सौ श्वेता संतोष जाधव.

 

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती शरद उर्फ बापू सुरेशराव मोरे, सौ. विदुला विराजसिंह यादव, सौ.रेखा बाळासो कोरे, शाहू सुकुमार कोळी.

Leave a Comment

error: Content is protected !!