शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर विषय समित्यांच्या रचनेकडे सर्व नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. आज सर्व सभापती निवडी होणार आहेत.नगर परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम समिती,आरोग्य,स्वच्छता व वैद्यक समिती,पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती,महिला व बाल कल्याण समिती,शालेय शिक्षण व क्रीडा समिती या महत्त्वाच्या विषय समित्या आहेत.शिरोळ नगर परिषदेमध्ये शिव शाहू प्रणित यादव पॅनेलची एकहाती सत्ता पॅनेलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांच्या कोणाला संधी देणार शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक समितीचे महत्त्व लक्षात घेता, अनुभवी व सक्षम नगरसेवकांनाच संधी दिली जावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सौ.अनिता गजानन संकपाळ, आरोग्य,स्वच्छता व वैद्यक समिती सभापती विजय आरगे,पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी सौ. कल्पना काळे तर शालेय शिक्षण व क्रीडा समिती सभापती पदी शरद मोरे यांची यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत सभापती पदासाठी पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे.दुपारी १ ते ३ या वेळेत मुख्याधिकारी यांना विषय समितीचे सभापती पदाचे पत्र सादर करणे व ३ ते ३.३० या वेळेत छाननी व अर्ज माघार घेणे,सायंकाळी ४ वाजता मुख्याधिकारी समिती सभापती निकाल जाहीर करतील.यादव पॅनेलमध्ये अनेक इच्छुक नगरसेवक सभापतीपदासाठी प्रयत्नशील असून,पॅनेल प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव हे सर्वांशी चर्चा करून योग्य समतोल साधत निर्णय घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.आज सायंकाळी ४ वाजता सभापती निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.त्यानंतर शिरोळ नगर परिषदेच्या विकासकामांना अधिक गती मिळणार आहे.त्यामुळं आजच्या सभापती पदी निवडीकडे शिरोळवाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.