शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील जगदाळे गल्ली, नदीवेस येथे कार्यरत असलेल्या श्री ओम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार असून परिसरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या सोहळ्याचे उद्घाटन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेवक शाहूल कोळी तसेच ओंकार माने – गावडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी अनिलकुमार यादव, विराज जगदाळे, आप्पासो पुजारी सर, गजानन सावंत, श्री. सतपाल खाडे (उपसरपंच, घालवाड), राज देसाई, उदय गंगधर व सत्यजीत गुरव हे मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता महाअभिषेकाने होणार असून सकाळी ११ वाजता वेदांत केसरी ह.भ.प. किसनमहाराज माने यांचे प्रेरणादायी प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री गणेशाचा जन्मकाळ साजरा करण्यात येणार असून दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ५ वाजता विठू माऊली महिला भजनी मंडळ, नदीवेस जगदाळे गल्ली, शिरोळ यांच्या सुमधुर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी ७ वाजता महाआरतीने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे.महाप्रसादासाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या गणेशभक्तांनी बाळासाहेब आनंदराव जगदाळे, अध्यक्ष, श्री ओम मंडळ (मो. ९८६०२७४९४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.