पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले . अपघात करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने पुढील एका खाजगी बसलाही धडक दिली.पोलिसातून मिळालेली अधिक माहीती अशी कि गंभीर जखमी असलेले तोसीम हामजेखान नदाफ ( वय ४० ) हे पत्नी सुरैय्या तोसीम नदाफ( वय ३६, दोघेही रा. गांधीनगर, आष्टा) आपल्या मोटारसायकल ( क्र. एम एच १० सी पी २३८३ ) ने गोकुळ शिरगाव येथे कामासाठी जात होते . ते महामार्गावरून पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्यासमोर आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक( क्र. एम एच १२ एल टी ९६१८) ने जोराची धडक दिल्याने नदाफ दाम्पत्य रस्त्यावर पडले यात तोसीम नदाफ व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले . धडक देवून ट्रक चालक जखमींना कोणतीही मदत न करता ट्रक घेवून पळूण जाण्याच्या प्रयत्नात असताना पुढे असलेल्या खाजगी बसलाही (क्र. जी ए ०३ व्ही ७२४५ ) ला धडक दिली यात ट्रक , बस , दुचाकीचे मोठें नुकसान झाले . याबाबतची फिर्याद रमजान शब्बीर नदाफ यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे .