शिवशक्ती मंडळ आयोजित महिला गृहउद्योग प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ नदीवेस या मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय महिला गृहउद्योग प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये सुमारे लाख रुपयाची उलाढाल झाली.शिरोळ पालिकेचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्या हस्ते व माजी जि. प. सदस्या सौ. इंद्रायणी पाटील, सौ अरुणा पाटील, सौ. सारिका माने, ‌सौ. अनुराधा माने, श्रीकांत जगदाळे, सर्जेराव माने, देवानंद जाधव, महेश जाधव, अनिकेत काटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महिला गृहउद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी परिसरातील महिलांनी विविध प्रकारचे महिला गृहउद्योगाचे स्टॉल प्रदर्शनासाठी माडले होते. शहरातील असंख्य महिलांनी या महिला गृहउद्योग प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे सुमारे लाख रुपयाची उलाढाल झाली. या प्रदर्शनासाठी जिजाऊ महिला भिशी ग्रुपच्या सौ. सविता मोरे,सौ. विनया माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!