उदगाव जि.प. मतदारसंघातून संतोष बिडवे यांनी निवडणूक लढवावी; सर्वसामान्य नागरिकांतून मागणी

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते तथा वारकरी संप्रदायाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष बिडवे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी,अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमीच अग्रेसर राहणारे,निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संतोष बिडवे यांची मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाच्या मनात आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यात संतोष बिडवे यांना यश आले आहे.कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती,तसेच सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.याच विश्वासाच्या जोरावर त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी भावना मतदारसंघात व्यक्त होत आहे.सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्याने कार्यरत असलेले संतोष बिडवे हे वारकरी संप्रदायाचे सक्रिय कार्यकर्ते असून हरिनाम सप्ताह,दिंडी सोहळे,भजन-कीर्तन अशा उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.यासोबतच कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, युवकांसाठी क्रीडा उपक्रम तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात.त्यांच्या या कार्यामुळे समाजातील युवकांना सकारात्मक दिशा मिळत असून ते युवकांचे आदर्श बनले आहेत.मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून कोणत्याही अडचणीच्या वेळी ते धावून येतात, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.आरोग्य,शिक्षण, पाणीपुरवठा,रस्ते अशा मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.विशेषतः गरजू,गरीब आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे.राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारे,निष्कलंक चारित्र्याचे आणि पारदर्शक कार्यपद्धतीचे नेतृत्व आजच्या काळात आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अशा निस्वार्थ,चारित्र्यसंपन्न आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराने निवडणूक लढवावी,अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे.जर संतोष बिडवे यांनी निवडणूक लढवली तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रभावी नेतृत्व देतील, असा विश्वास नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असून,आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!