पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमधील भारत मशीन टुल्ससमोर शिरोली ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून वेस्ट मेडिसीन रस्त्यावर पडून सर्वत्र विखुरले त्यामुळे कामगार व वाहनधारकांना नाहक त्रास झाला , शेजारील चहा टपरी चालकाने या घटनेचे गांभीर्य ओळखून ते झाडूच्या सहाय्याने एकत्र करून रस्त्याकडेला लावले .पुलाची शिरोली येथील गावातील दवाखान्यातून वेस्ट,सुई,सिरिज,ग्लोज, बँडेज,औषधे तर काचच्या बाटल्या घंटागाडीतून शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या घनकचरा डेपोकडे टाकण्यास जात असताना भारत मशीन टुल्सच्या समोरील वळणावर हे वेस्ट मेडिसिन रस्त्यावर पडले हे काही लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यानी घंटागाडी चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही .वेस्ट मेडिसिन रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने नागरिकांना मोठा त्रास होत काहींच्या गाड्याही पंचर झाल्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे असणाऱ्या चाय टपरी चालक मिश्रा याने ते झाडूच्या सहाय्याने एकत्र गोळा करून तो रस्त्याच्या कडेला ठेवले.ज्या घंटागाडीतून हा वेस्ट मेडिसीन रस्त्यावर पडले ती गाडी येथून परत शिरोली गावाकडे जात असताना त्याला हा रस्त्यावर पडलेला कचरा दिसला नसावा का ? दिसला असेल तर त्याने गाडी थांबवून कचरा गाडीत भरून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सध्या शिरोलीच्या घनकचरा डेपो औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याने तो इतरत्र हलवण्यासाठी उद्योजक प्रयत्न करत आहेत असा कचराजर औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर पडत असेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे उद्योजकातून बोलले जात आहे.