नागाव येथे विजेचा शॉक लागून वानर गंभीर जखमी, वनविभागाच्या रिस्क्यु पथकाने घेतलं ताब्यात 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

दोन दिवसांपूर्वी विजेच्या उच्च दाबाचा शाँक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या वानरास वनविभागाच्या रिस्क्यु पथकाने उपचार करून जिवदान देण्यासाठी नेल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.त्याचा जीव वाचवण्यासाठी अनेकांनी देवाकडे साकडे घातले आहे.ही घटना नागाव ता.हातकणंगले येथील आंबेडकर नगर परिसरात घडली.नागाव ता.हातकणंगले येथील आंबेडकर नगर परिसरात गेली काही दिवसांपासून एका वानराने आपले वास्तव्य केले होते. सिध्दार्थ ग्राउंडच्या आसपासच्या गर्द झाडीत ते वावरत होते.मिळेल ते खाऊन बागडत होते.अशा या वानरास दोन दिवसांपूर्वी एका झाडाजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज तारांना त्याचा स्पर्श झाला जोराचा शाँक लागला आणखी ते जमिनीवर कोसळले.निपचित पडलेल्या वानरांचे काही कुत्र्यांनी लचके तोडले. अशा अवस्थेत ते कसेबसे जवळच्या झाडावर चढले आणि कुत्र्यांपासून सुटका करून बचावले.जिव वाचविण्यासाठी या घरावरून त्या घरावर अन्न पाण्याशिवाय धडपडत राहिले.हे येथील नागावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्या घराच्या टेरेस वरती वानर बसल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्याला जिवदान देण्यासाठी त्यांनी वन विभागाच्या रिस्क्यु पथकाला पाचारण केले.वन विभागाच्या रिस्क्यु पथकाचे प्रमुख प्रदिप सुतार यांनी आपल्या ताब्यातील सर्व साहित्यांनी सज्ज अशा रिस्क्रु गाडी सह येऊन त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत न होता सुरक्षित पणे घेऊन गेले.आमची मराठीशी बोलतांना ते म्हणाले या वानराला जोरदारपणे शाँक लागला आहे.त्यास वाचविण्यासाठी आवश्यक ते आम्ही सर्व प्रकारचे उपचार करणार आहे. ते बरे झाले नंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!