श्री सदाशिव नारायण पाटील विद्यानिकेतन विलास नगर चे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा भव्य व दिमागदार

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील श्री सदाशिव नारायण पाटील विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या पटेल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक सदाशिव नारायण पाटील,अध्यक्ष डॉ.मनोज कुमार पाटील,उपाध्यक्ष महेश कुमार पाटील, सचिव सौ. माधवी पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन आजगेकर, सौ.रजनी भोसले, प्रफुल्ल शिंदे,सौ. आदिती कुलकर्णी,केदारी मगदूम मुख्याध्यापक दऱ्याचे वडगाव ,शिरोली लोकनियुक्त महिला सरपंच सौ.पद्मजा करपे , उपसरपंच विजय जाधव,शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महंमद महात,श्रीकांत कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. कमल कौंदाडे,सौ.मनीषा संकपाळ,पत्रकार संदीप कांबळे,संस्थेचे संचालक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक पत्रकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक सदाशिव नारायण पाटील शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर,अध्यक्ष मनोज कुमार पाटील, उपाध्यक्ष महेश कुमार पाटील तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष मनोज कुमार पाटील हे होते.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांनी प्रास्ताविक सादर करताना शाळेची वाटचाल शाळेची प्रगतीची माहिती दिली सदाशिव नारायण पाटील विद्यानिकेतन नावाप्रमाणे संस्कार, सांस्कृतिक,विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शाळेच्या सचिव सौ माधवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांनी अशा गुणदर्शन कार्यक्रमातून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा त्याचबरोबर मोबाईलचा वापर टाळून अभ्यासाकडे व मैदानी खेळाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचबरोबर शाळेमधील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्या म्हणाले की शाळेतील शिक्षक हे जातीनिशी सर्व स्पर्धा परीक्षा घेतात त्या परीक्षांसाठी शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला घडविण्याचे काम करतात त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मिरीट मध्ये येण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्याबद्दल शाळेच्या सचिवांनी शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे प्रफुल्ल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले विद्यार्थी जीवनाचा पाया प्राथमिक शाळेमध्येच घातला जातो त्यामुळे अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन शाळेचे व शिक्षकांचे आपल्या पालकांचे व आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे आपल्या मनोगता ते म्हणाले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन ,दीपप्रज्वलनाने झली.या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये नाते संबंध,प्रबोधनात्मक, समाज प्रबोधनात्मक देशभक्तीपर मनोरंजनात्मक या विषयावर नृत्य व नाटिका विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्याचे व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आयारे तुफान,मराठा सैन्य विजय उत्सव,रडू नको बाळा , इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीपर नाटिका,हिंदी मराठी रिमिक्स गीते सादरीकरण करत असताना उपस्थित पालक व मान्यवराना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू श्रावस्ती,सौ.प्रियंका पाटील,सौ.अर्चना काळे, स्नेहल कोळी व इयत्ता दहावीच्या मुलींनी अत्यंत उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाचे नियोजन संचालिका सौ.प्रतिभा पाटील, शशिकांत पाटील,कुंडलीक जाधव,माध्यमिक मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री डोईफोडे यांनी केले.हा सोहळ्या यशस्वी व उत्कृष्ट नियोजन, सादरीकरण आणि व्यवस्थापन संस्थापक सदाशिव पाटील,अध्यक्ष मनोज कुमार पाटील , शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांच्यामुळे शक्य झाले.विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून योग्य असा प्लॅटफॉर्म देण्यासाठी ते कायम धडपडत असतात.आभार कुंडलीत जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!