कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणारा टेम्पो पकडला दोघांवर गुन्हा दाखल 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे बेकायदेशीरपणे कर्नाटकातील कत्तलखान्याकडे जनावरे घेवून जाणारा पिकअप टेम्पो गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडला व शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिला.त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर जनावरांची तासगाव येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार कराड येथील जनावरांच्या बाजारातून तिन बैल कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील चिंचणी वडराळ येथे कत्तलखान्यात घेवून जात असल्याची माहिती कराड येथील काही गोरक्षकाना मिळाली होती . त्यानुसार पिकअप गाडी ( क्र.के ए ३४ बी ६२६८) चा पाठलाग केला पण त्यांना चकवा देवून गाडी फरार झाली होती.‌तेव्हा पुलाची शिरोली येथील गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संबधीत गाडी माहिती व गाडी नंबर दिला त्यानुसार कार्यकर्त्यांनी नागाव फाटा येथे सापळा लावून दुपारी 2 वाजता गाडी पकडण्यात आली.यातील आरोपी बाळाप्पा भिमगोंडा पाटील (वय ३१ रा.वडराळ ता.चिक्कोडी जि.बेळगांव),सतिश भरमु खोत ( वय ३२ रा.हडयानवाडी ता.चिक्कोडी जि.बेळगांव) यांच्याकडे याबाबत विचारणा करताच त्यानी प्रथमदर्शनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कार्यकर्त्यांनी जनावरांची माहितीगार असणार्या व्यक्तीकडून तपासणी करून हे जणावरे कत्तलखान्यात जात असल्याच्या संशयावरून शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले. शिरोली पोलिसांनी घटनेची व गाडीची तपासणी करताच त्याना पिकअप टेम्पोमधून अत्यंत क्रूरपणे तिन खिल्लार जातीचे तिन बैल बांधून चारापाण्याची सोय न करता व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले.या बैलांना अनावश्यकपणे घट्ट बांधुन जखडुन, दाटीवाटीच्या अवस्थेत ठेऊन त्यांची क्रुरतेने ती कत्तल करण्याच्या उद्देशाने कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची मिळाल्याने त्यानी आरोपी यांच्यावर प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियम कलमाच्या व महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम कलमाच्या व मोटार वाहन अधिनियम कलम, केंद्रिय मोटार वाहन नियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम,या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबतची फिर्याद श्रीकांत हिमंत कदम यानी शिरोली पोलिसात दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!